समर्थ रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळा विषयी

Download User Guide Download Release Note

समर्थ रामदास स्वामींनी विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. दासबोध , मनोबोध , आत्माराम , अभंग , आरत्या , जुना दासबोध , करुणाष्टके व अन्य अनेक रचना त्यांनी केल्या. समर्थांचे भक्त , त्यांच्या विचारांचे अभ्यासक आज जगभर आहेत. त्या सर्वाना एखाद्या विषयानुसार त्यांचे ग्रंथ शोधणे सोपे जावे , एखादा शब्द असलेली ओवी , श्लोक , अभंग सापडणे सोपे जावे , त्यातील कठीण शब्दांचा अर्थ मिळावा अशा विविध कारणासाठी या संकेतस्थळाचे काम सुरू आहे.

सध्या या संकेतस्थळावर दासबोध , मनोबोध , आत्माराम, जुना दासबोध या ग्रंथांचे साठी वर उल्लेख केलेल्यातील काही सोयी उपलब्ध आहेत . त्यांच्या अन्य साहित्यासाठी देखील विविध सोयी येथे उपलब्ध करून द्याव्यात असा मानस आहे. समर्थांचे काही साहित्य अन्य भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे. ते देखील यथावकाश येथे उपलब्ध करणार आहोत.

स.भ. योगेशबुवा रामदासी, सज्जनगड यांचे आशीर्वाद या उपक्रमास लाभले आहेत.

या कामी पुढील संस्थानी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले आहे :

श्री समर्थ सेवा मंडळ सज्जन गड http://www.shrisamarthsevamandal.org/
श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन https://www.dasbodhabhyas.org
दासबोध सखोल अभ्यासक्रम dasaupkram2019@gmail.com

या कामी अनेकांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले आहे. त्यातील काही प्रमुख उल्लेख येथे आवश्यक आहेत.

‘दासबोध सखोल अभ्यास’ उपक्रमाचे विद्यमान संचालक : डॉ. विजय लाड , नांदेड
‘श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन’ चे विद्यमान अध्यक्ष : श्री. सुहास क्षीरसागर , पुणे
समर्थ भक्त व ज्येष्ठ समर्थ साहित्य अभ्यासक : श्री. रवींद्र फडके , बंगळूरू
समर्थ भक्त : श्रीमती कल्पना धर्माधिकारी, पुणे

सर्व काम स्वयंसेवकांनी , श्री रामदास स्वामींची सेवा या भावनेने केले आहे. कोणत्याही ग्रंथाच्या ओव्या , श्लोक , अभंग यात जर टायपिंग च्या चुका आढळल्या, software मधे जर काही चुका आढळल्या तर त्या मोठ्या मनाने माफ कराव्यात ही विनंती.

हे संकेतस्थळ अभ्यासकांना उपयोगी पडेल अशी आशा आहे.

आपल्या सूचना , अडचणी , मार्गदर्शन , सहभाग या विषयी info@ramdasswami-sahityashodh.in येथे ई मेल करावी. हे संकेत स्थळ कायम निशुल्क असेल याची नोंद घ्यावी.

||जय जय रघुवीर समर्थ||