आले संसाराचें ज्ञान| तेणे जालें समाधान ||१||

सकाळ सारांचे ही सार | ऐसा माझा हा संसार ||धृ ||
कैचा देव कैचा धर्म | तीर्थयात्रा कैंचा भ्रम ||२||

कैंचे ध्यान कैंचे ज्ञान | अन्न हेंचि समाधान ||३||
व्यर्थ गाणें हे लौकिकी | येणें पोट भरेना कीं ||४||

रामदास म्हणे भले | आम्हां सत्य हें मानले ||५||अंध अंधारी बैसले | त्यास हाते खुणावलें ||१||

त्यास कळेना कळेना! त्याची वृतीच वळेना ||धृ ||
संत संगाचें बोलणें | सांसारिक काय जाणे ||२||

म्हणे रामी रामदास | केला नसता अभ्यास ||३||काही कळेना विचार | अवघा जाला शून्याकार ||१||

उमजेना सांसारिक |आठवेना परलोक ||धृ ||
अंध विवरी पडिले |अंधकारी सापडले ||२||

मायाजालें गुंडाळले | वासनेने वेटाळिले ||३||
कामक्रोधें जाजावले | मदें मछरें पिडिले ||४ ||

रामी रामदास म्हणे | अज्ञानाचीं ही लक्षणें ||५||नेला संसारें अभ्यास | केला आयुष्याचा नाश ||१||

सदा उठता बैसतां | लाभेविण केली चिंता ||धृ ||
नाही साक्षेपाचा वेग | उगेंचि मांडिले उद्वेग ||२||

रामी रामदास म्हणे | ऐसे जीतचि मरणे ||३||कल्पनेची भरोवरी | मन सर्व काळ करी ||२||

स्वप्न सत्याची वाटलें | दृढ जीवेसी धरिलें ||धृ ||
अवघा मायिक विचार | तोचि मानिला साचार ||२||

नाना मंदिरें सुंदरें | दिव्याम्बरें मनोहरें ||३||
जीव सुखे सुखावला | थोर आनंद भासला ||४||

रामदास म्हणे मद | लिंग देहाचा आनंद ||५||

शब्दार्थ ----

शब्दार्थ -panchak

भावार्थ ---


भावार्थ -panchak