आता विलंब न लावावा हो | पै या प्रसाद घ्यावा हो |
|धृ ||
सांगे मुनीवर तिघींस सत्वर स्नान दान सारा |
पुरुष पराक्रमी तो जगदीश्वर येईल तुमच्या उदरा ||
१||
जेष्ठ वसिष्ठ वाटून देऊनि यागसिद्धि केली |
जेष्ठ भागा न पवे म्हणऊनि कैकई कष्टी जाली ||
२||
भविष्य वदला वाल्मिक ज्याला चुकविल कोण तयाला |
विकल्प रचला तटस्थ पाहता घारी अंश नेला ||
३||
भाग विभागुनि दे कौसल्या तेचि परी सुमित्रा |
दोनी अंश घेऊनि देती समजाविल्या सत्पात्रा ||
४||
हर्षत नृपवर सकळ ऋषेश्वर यज्ञ सिद्ध जाला |
भूतलवासी येऊनि समयी आनंदविले दासाला ||
५||