गजेंद्र सावज पडला पानवडी|
रामें तेथे उडी टाकियेली ||१||
प्रल्हाद गांजिता कोण साहाकारी|
स्वयेंचि मुरारि प्रगटला||२||
क्षत्रियें ब्राह्मणें गांजिली बापुडी|
रामें तेथे उडी घातियेली||३||
तेहतीस कोटी देव पडिले बांदोडी|
रामें तेथे उडी टाकियेली||४||
दासापायीं पडली देह बुद्धि बेडी|
रामें तेथे उडी टाकियेली||५||
रामदास म्हणे नका करूं शीण|
रामे भक्त कोण उपेक्षिले||६||