पडतो संकष्ट जीवा जडभारी |
स्मरावा अंतरीं बलभीम ||१||
बलभीम माझा सखा सहोदर |
निवारी दुस्तर तापत्रय ||२||
तापत्रय बाधा बाधूं न शके कांहीं |
मारुतीचे पायीं चित्त ठेवा ||३||
ठेवा संचिताचा मज उघडला |
कैवारी जोडला हनुमंत ||४||
हनुमंत माझे अंगींचें कवच |
मग भय कैचें दास म्हणे ||५||