आंबे नाम तुझे चांगले | मन माझे रंगले ||
मी तरी तुझे वो बालक | न करी जगपांगिले || धृ ||

पवित्र ठाणक माहोर | दुसरे तुळजापूर |
तेथे नांदती सुंदर | संतांचे माहेर || १ ||

तिसऱ्याने गाईन मी आऊंद | लागला तुझ्या छंद |
मूळ पीठ शिखरी भवानी | तू माझी स्वामिनी || २ ||

चौथ्याने गाईन मी रेणुका | सप्तश्री चंडिका |
गोंधळ घालिन मी भवानी | ध्यान तिही लोका || ३ ||

तुज मी ध्यातसे अंतःकरणी | तू माझी स्वामिनी |
दास करीतसे विनवणी | दोन्ही कर जोडुनी || ४ ||

शब्दार्थ ----

भावार्थ ---


देवी आंबाबाईत मन रमले आहे. या देवीचे श्रीसमर्थ बाळ असल्यामुळे तिने लोकात जगात त्यांचे ओशाळे करु नये . कोल्हापूरची आंबाबाई , माहुरची रेणुकामाता , तुळजापूरची भवानीआई , औंधची यमाईमाता , सप्तशृंगी गडावरची देवी चंडिका भवानी या सर्व देवींना दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रपणे , श्रीसमर्थांनी जो शुद्ध ज्ञान वैराग्याचा , नवविधा भक्तीचा प्रसार आरंभीला आहे .त्या प्रसार कार्याच्या गोंधळाला जागराला येण्याची विनवणी श्रीसमर्थ करीत आहेत. त्यांच्या या कार्यात विघ्न येऊ नये , यश प्राप्त व्हावे म्हणून त्यांना येण्याचे आवाहन , विनंती करीत आहेत.