कोणाचे हत्ती घोडे | वाडे वाडे पवाडे |

दिवसंदिवस वमक वाढे | संसार मोडे |
|धृ||
वय जातसें पळेपळ | जिणे हे चंचळ |

केंव्हा येईल काळवेळ | देह विकळ |
| १||
दास म्हणे सोय धरी धरी विवरी |

काय येणार बराबरी विचार करी ||
२ ||