🚩|| श्री समर्थांचे लघुकाव्य पंचीकरणयोग ||🚩

" मी " चा शोध घेताना पंचिकरण संकल्पना जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. ती जाणून घेतल्याशिवाय स्वस्वरूपाचे कोडे उलगडणार नाही. श्रीसमर्थांनी "पंचीकरण योग" या लघुकाव्यातील प्रकरणात उत्तमरीत्या उलगडून सांगितले आहे. १. परब्रह्माचे स्वरूप २. मूळमाया ३. अंतरात्मा ४. सृष्टीनिर्मिती ५. मानवी जीवनातईश्वराचे प्रत्यक्ष स्थान व कार्य ६. ईश्वराचे सृष्टीतील अस्तित्व ७. मी कोण ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लघुकाव्यात सापडतात. ती साधकांना आणि अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही.