जळो त्यांचे हो वैराग्य |
ज्यासि नाही आत्मसंग ||१||
जळो त्याचा हा संसार |
तो चि दुरात्मा पामर ||२ ||
नाहि आत्मारामासी भेट|
जळो त्याचा तत्वपाठ ||३||
रामी रामदास म्हणे |
नर्क केला त्या करणे ||४||