खासील लेसील देसील घेसील तेंचि तुला तितुकें तरि भोगे ।
काळचपेट लपेटित लटित दाटित ते नव्हती तुज जोगे
कर्कश हाकुनि झोकुनि टाकुनि मारिती रेमनुजा तुज घोगे ।
दास म्हणे हरिदास्य करीं तरि धृव जसा न चळे वरितो गे ।। १ ।।