शब्दार्थ ----
भावार्थ ---
श्री समर्थ लिखित ही पहिली सवायी केवळ चार चरणांची आहे. यात नेहमीच्या प्रथेप्रमाणे आधी गणपती गजाननास वंदन केले आहे. गणपती हे दैवत सर्व सुखाचे माहेरघर आहे. ज्या गणपतीने मदनाला जाळले व सर्व सुखाचे आगर आपल्याला दिले त्या गणेशाला अंतरी धरा. राम राम राम असे अखंड रामनाम घेत, जिथे सज्जनजन विश्राम घेतात, जिथे सज्जनाच्या जीवाला विश्राम मिळतो, जे साधकाचे निजधाम आहे, अशा गणेशाचे अखंड चिंतन करुन आपले हित साध्य करा. गणेशाचे अखंड मनन चिंतन निजध्यास निदध्यास करण्याचा अभ्यास अंतरी धरा. याचा नामाचा अखंड ध्यास धरा. तसेच हरिभजन हरिकीर्तन करुन स्वतःचा उद्धार करुन घ्या असे व्यास ऋषींनी यांनी पण सांगितले आहे. हा गणेश उदार आहे. शांत धीर गंभीर आहे. सुंदर आहे. याने बंदिवासात असलेल्या देवांची सुटका केली आहे हा गणेश वरदायक आहे. यामुळे या गणेशाचे अखंड चिंतन मनन निदिध्यास करुन त्याला प्रसन्न करुन वरप्रसाद प्राप्त करुन घ्या थोडक्यात श्रीसमर्थ यांनी प्रथम श्रीगणपतीस वंदन करून रामाचा अखंड निजध्यास अंतरी धरण्यास सांगितले आहे